मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

‘डार्कनेट’वरील आतंकवाद्यांच्या संभाषणातून अन्वेषण यंत्रणांनी वर्तवली शक्यता !

ड्रोन (प्रातिनिधिक छायाचित्र )

(डार्कनेट – ‘सर्च इंजिन’च्या सूचीत न येणारा मायाजालाचा भाग किंवा सर्वसामान्यांना न दिसू शकणारा मायाजालावरील भाग)

मुंबई – मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून वर्तवण्यात आली आहे. ‘डार्कनेट’वर आतंकवाद्यांच्या झालेल्या संभाषणामध्ये या आक्रमणाचा उल्लेख झाल्याचे अन्वेषण यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात अतीदक्षता घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले