‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याच्या वेळी सांगली जिल्ह्यातील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

१९.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या काही जिज्ञासूंच्या अनुभूती १३.१.२०२२ या दिवशीच्या अंकात पाहिल्या. आज उर्वरित जिज्ञासूंच्या अनुभूती पाहूया.

‘भगवंताच्या भक्ताची जो काळजी घेतो, त्याची भगवंत काळजी घेतो !’, या वचनाची मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. भरत प्रभु यांना आलेली प्रचीती !

‘पू. भार्गवराम माझे पुत्र असल्याने त्यांची काळजी घेणे’, हे खरेतर माझे कर्तव्यच आहे. असे असूनही भगवंताने मला स्वप्नात दर्शन दिले. पू. भार्गवराम यांचे दायित्व माझे असूनही भगवंताने माझ्याप्रती काळजी व्यक्त करून माझ्यावर कृपा केली. या प्रसंगातून मला जाणवले, ‘भगवंत किती श्रेष्ठ आणि महान आहे ! तो सर्वव्यापी आहे. ‘प्रत्येक दायित्व हे त्याचे आहे’, असे त्याला वाटते.