बंगालमध्ये रेल्वेगाडीच्या अपघातात ३ जणांचा मृत्यू !

जलपाईगुडी (बंगाल) – येथे बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस (क्रमांक १५६३३) या रेल्वेगाडीला १३ जानेवारीच्या सायंकाळी ५ वाजता भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रेल्वेगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, तर एकूण १२ डब्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे. शेवटची माहिती हाती आली, तोपर्यंत अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य चालू होते. या आगगाडीतून एकूण १२०० लोक प्रवास करत होते.