‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार यांविषयीच्या बातम्या 

अशरफ अलीने संपत्तीसाठी केली हिंदु प्रेमिकेच्या वृद्ध वडिलांची हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हिंदु मुलींनी स्वत:चे आयुष्य आणि कुटुंब वाचवण्यासाठी धर्मांधांपासून जागृत होणे आवश्यक आहे ! – संपादक 

लुधियाना (पंजाब) – येथे एका धर्मांधाने संपत्तीसाठी त्याच्या हिंदु प्रेमिकेच्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांची कुर्‍हाडीने हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अशरफ अली (वय ३८ वर्षे) या आरोपीला अटक केली आहे. त्याने प्रेमिकेचे वडील शिंदर सिंह यांचे घर कह्यात घेण्यासाठी त्यांची हत्या केली.

१. मलेरकोटला येथील अशरफ अली हा त्यांच्या घरी ये-जा करत होता. शिंदर यांची मुलगी पतीपासून विभक्त झाली होती आणि वडिलांकडे रहात होती. हे लक्षात घेऊन आरोपी अशरफ याने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले.

२. २३ डिसेंबर या दिवशी मृतक शिंदर सिंह बुटाहारी कालव्याजवळ झाडे रंगवण्यासाठी घरून निघाला होता. तेव्हा अशरफने संधी साधून त्याच्यासमवेत मद्यपान केले. त्यानंतर त्याने शिंदर सिंहावर कुर्‍हाडीने वार केले. यात ते जागीच ठार झाले. लोकांना अशरफवर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.


फरहान अहमदला जामीन देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार

लग्नाचे प्रलोभन देऊन बलात्कार आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

आधुनिक संपर्काच्या साधनांमुळे जग जवळ आले आहे. त्याचा अपलाभ घेऊन मोठ्या प्रमाणात धर्मांध हिंदु महिलांना फसवत आहेत, हे लक्षात घेऊन हिंदु युवतींनी सतर्क रहावे अन् धर्माचरण करून आत्मबळ वाढवावे ! – संपादक

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – लग्नाचे प्रलोभन देऊन महिलेवर बलात्कार करणे आणि बलपूर्वक धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, असे आरोप असणार्‍या फरहान अहमद उपाख्य शानू याला जामीन देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. या वेळी ‘आरोपीच्या विरोधात गंभीर आरोप असल्याने त्याला जामिनावर मुक्त करता येत नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पीडिता फेसबूकच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कामध्ये आली होती. आरोपीने गोरखपूर येथील नगरपालिकेचा कर निरीक्षक असल्याचे सांगितले होते. परिचय वाढल्यानंतर पीडितेने अहमदसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. जेव्हा तिने लग्न करण्यास सांगितले, तेव्हा त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास सांगितले आणि ठार मारण्याची धमकी दिली.