प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रजास्ताकदिन जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

माहीम गडावर वसाहत निर्माण करून धर्मांधांनी संपूर्ण गडच बळकावल्याचा धक्कादायक प्रकार !

गड आणि दुर्ग यांच्या संवर्धनाची सरकारची घोषणा; पण धर्मांधांनी बळकावलेल्या गडांचे काय ?

देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले !

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा दर आता १४.७८ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

पंजाबात भारत-पाक सीमेवर सापडले ५ किलो आर्.डी.एक्स. !

ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वच निवडणुका कधीच शांततेत पार पडत नाहीत. आतंकवादी, नक्षलवादी, गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीला अपयशी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी !

ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य !

तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू झाले आहेत अल्पसंख्यांक ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल !

मानकर्‍यांच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा उत्साहात !

‘हर हर महादेव’, ‘एकदा भक्त लिंग हर बोला हर…’ च्या जयघोषाने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला. ‘दिड्डम्, दिड्डम्, सत्यम्, सत्यम्…’ या संमती वाचनाने श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला.

गोव्यात पुढील आठवड्यात प्रतिदिन १० ते १५ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची शक्यता ! – डॉ. शेखर साळकर, कोरोना कृती दलाचे सदस्य

कोरोनाविषयक चाचणीचे अहवाल उशिरा मिळणे आणि खासगी कोरोना चाचणी केंद्रांनी नियम डावलून अधिक दर आकारणे यांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय !

गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७२८ कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अंदाजे १०० जण कोरोनाबाधित

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य, अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’