पाक आणि धर्मपरिवर्तन !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.

विक्रमगड येथील कोविड केंद्रातील जेवणात अळ्या सापडल्याची रुग्णांची तक्रार !

विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगडनजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड केंद्र चालू केले आहे. रुग्णालयाकडून सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प.

विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच..!

हिंदुद्वेष्टे यांनी हिंदु धर्माच्या विरोधात कितीही गरळओक केली, तरी हिंदूंच्या मनातील भगवंतभेटीचा भक्तीरस अखंड वहात आहे, जो वारीच्या निमित्ताने अनुभवता आला. वारीच्या दिवशी  प्रत्येक हिंदूच्या मनात विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच अनुभवता आला !

घुसखोरांसाठी धर्मशाळा बनलेला भारत !

चेन्नई पोलिसांनी अवैधरित्या राहून लूटमार करणार्‍या ९ इराणी मुसलमान नागरिकांना अटक केली. यात ३ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्डही जप्त करण्यात आली आहेत.

इंग्रजांचे गृहमंत्री जॉन बटरी अर्नेस्ट हॉटसन याच्यावर गोळ्या झाडण्याचे धाडसी कृत्य करणारे वासुदेव बळवंत गोगटे !

सोलापूरमधील हत्याकांडास कारणीभूत असणार्‍याला हॉटसनने पाठीशी घातले होते. याचीच चीड येऊन वासुदेव बळवंत गोगटे या तेजस्वी तरुणाने वरील धाडसी कृत्य केले. आज या घटनेस ९० वर्षे पूर्ण होत आहेत.

सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत अल्पसंख्यांक बहुसंख्य कसे ?

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतून रमजान शेख याला ५० ग्रॅम हॅशिशसह क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली.

गुन्हेगारांना पाठिंबा देणारी राष्ट्रवादी काँग्रेस !

‘ईडी’ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता धाड घालून कह्यात घेतली. याविषयी ‘इतक्या जुन्या व्यवहारांची चौकशी का केली जात आहे ?’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केला आहे.’

गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षि व्यास यांची वर्णिलेली महती !

महर्षि व्यास हे समाजाचे गुरु होते; म्हणून परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली. व्यासपौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून संपूर्ण भारतवर्षात साजरी होऊ लागली.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ! या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे.