विक्रमगड येथील कोविड केंद्रातील जेवणात अळ्या सापडल्याची रुग्णांची तक्रार !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, २१ जुलै (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील रिवेरा कोविड केंद्रामध्ये सलग २ दिवस पुरवण्यात आलेल्या अन्नात अळ्या आढळल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांच्याकडे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगडनजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड केंद्र चालू केले आहे. रुग्णालयाकडून सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत.