गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला.

बागपत येथे धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे धर्मांतर करत गोमांस खाऊ घातले !

अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का करत नाहीत ?

भारताच्या विभाजनाची आठवण करून देणारे जिन्ना हाऊस कह्यात घेऊन तेथे कला आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया त्वरित चालू करावी ! 

भारताच्या विभाजनाची दुःखद आठवण करून देणारे जिन्ना हाऊस स्वातंत्र्यानंतर ओस पडून आहे. स्वातंत्र्यापूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांनी १० वर्षे तेथेच राहून भारताचे ३ तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचा कट रचला होता.

गर्भपाताच्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ दिवसांत राज्यात १४ गुन्ह्यांची नोंद !

गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री केल्याप्रकरणी २६ जून ते ९ जुलै या कालावधीत राज्यात १४ गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे.

नागपूर येथील पोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी निलंबित !

अपंग मनोज ठवकर यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण, अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई नको, तर त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता ! – अभिनेत्री कंगना राणावत

आपल्याला मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले.

करहर (सातारा) येथील श्री विठ्ठल मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप !

आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील करहर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसराला २० जुलै या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कायदा तोडून मंदिरात प्रवेश करणार्‍या गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याऐवजी पोलिसांनी कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवला !

सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेशबंदी असतांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील आनंदवली येथील नवश्या गणपति मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आरती केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नगर येथील तत्कालीन नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात ६० पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात १९ जुलै या दिवशी न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले