भोर (पुणे)- भोर तालुक्यातील हतवे खुर्द गावात जादूटोणा केल्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आला. गुंजवणी नदीपात्रात मृतदेह फेकून आरोपीने अपघाताचा बनाव रचल्याचे अन्वेषणात उघड झाले. या प्रकरणी स्वप्नील खुटवड (वय ३० वर्षे) यांना कह्यात घेतले असून गणपत खुटवड (वय ५२ वर्षे) असे खून झालेल्यांचे नाव आहे. गणपत यांचे किराणामाल विक्रीचे दुकान होते. ते जादूटोणा करत असल्यामुळे प्रगती होत नसल्याचा संशय आल्याने स्वप्नील यांनी त्यांचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण केले.
भोर येथे जादूटोण्याच्या संशयातून खून !
नूतन लेख
- देवद गाव येथे पार पडली श्री दुर्गामाता दौड !
- उधार मागणार्या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !
- पुणे येथे शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार !
- पुणे येथे पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ प्रकरणी दुचाकीस्वाराचा मृत्यू !
- पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचे २ सदस्य बडतर्फ !
- पंढरपूर येथे भक्तनिवासाच्या नावे खोटी आगाऊ नोंदणी !