मुंबईत बेस्‍ट बसला अचानक आग लागून बस जळून खाक !

सुदैवाने जीवितहानी नाही !

जळून खाक झालेली बस

मुंबई – ३० सप्‍टेंबर या दिवशी पवई येथून एल्‌बीएस् मार्गाने विक्रोळीच्‍या दिशेने निघालेल्‍या बेस्‍ट बसला जेव्‍हीएल्‌आर्‌च्‍या गांधीनगर जंक्‍शनवर अचानक भीषण आग लागली. चालकाच्‍या प्रसंगावधानतेमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. बसमधून धूर निघत असल्‍याचे लक्षात येताच चालकाने तात्‍काळ बस थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. बसपासून लांब सुरक्षित अंतरावर जाण्‍यास सांगितले. काहीच क्षणात मोठ्या प्रमाणात आग पेटली आणि धुराचे लोट पसरले. बस पूर्णपणे जळून खाक झाली.

अग्‍नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे वाहतूककोंडी झाली. आगीमुळे बसमधील प्रवाशांना मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.

संपादकीय भूमिका :

पुण्‍याचे ज्‍योतिष अभ्‍यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांनी या सप्‍ताहात सामूहिक स्‍वरूपाचे अपघात होतील, असे भविष्‍य वर्तवले आहे. यावरून ज्‍योतिषशास्‍त्राचे महत्त्व लक्षात येते.