जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या कह्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.