लाडफे (डिचोली) येथील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान, कचरा आदींमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखले

जनतेमध्ये भोगवाद प्रचंड बोकाळल्यामुळे परिस्थितीचे भान न ठेवता अशी कृत्ये केली जातात !

व्यक्तीस्वातंत्र्य वाल्यांचे अज्ञान !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याकडून योगमुद्रेचे चिन्ह असलेल्या विशेष शिक्क्याचे अनावरण !

७ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल खात्याकडून योगमुद्रेचे चिन्ह असलेल्या विशेष रद्दबादल शिक्क्याचे अनावरण करण्यात आले. हा शिक्का हिंदी आणि इंग्रजी या २ भाषांत सिद्ध करण्यात आला आहे.

‘सीरम’च्या ‘कोवोवॅक्स’ चाचण्यांना केंद्राकडून अनुमती नाकारली !

भारतामध्ये १० ठिकाणी २ ते १७ वर्षे वयोगटातील मिळून ९२० मुलांवर कोवोवॅक्स लसीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी करण्याची अनुमती सिरम इन्स्टिट्यूटने औषध महानियंत्रकांकडे मागितली होती; मात्र ती अमान्य केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

यामी यांना ७ जुलै या दिवशी अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

नांदेड जिल्ह्यातील मुलींना फूस लावून पळवून नेणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

असे निवेदन हिंदुत्वनिष्ठांना का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवला आहे. अनिल देशमुख यांनी बार चालू ठेवण्यासाठी संबंधितांकडून घेतलेले ४ कोटी ७० लाख रुपये ऋषिकेश देशमुख यांना दिले.

जास्त देयक आकारणार्‍या भिवंडी येथील सिराज मेमोरियल रुग्णालयाचा परवाना २ मासांसाठी रहित !

भिवंडी शहरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवाना दिलेल्या आधुनिक वैद्य नुरुद्दीन अन्सारी यांच्या सिराज मेमोरियल रुग्णालयाने रुग्णांकडून उपचाराचे अधिकचे देयक आकारले, हे लेखा समितीच्या पडताळणीतून निदर्शनास आले.