वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून धर्मांध मुलांवर कोणते संस्कार करत आहेत, हे लक्षात येते. अशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
मुंबई – मुंबईतील राजीव गांधीनगर येथे मुलाच्या वाढदिवसाला गर्दी करून तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांनी मुलाचे वडील अफझल अलाउद्दीन आणि अन्य अशरफ शेख या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी येथील बंगालीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. २९ जूनला रात्री १० वाजता हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.