कोरोनामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली !
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याविषयीची माहिती दिली.