अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने अन्नदान सेवा अविरतपणे चालू

मागील एक मासापासून येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने कोरोना रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य गरजू यांना अन्नछत्र सेवेच्या उपक्रमातून विनामूल्य पौष्टिक अन्नदान केले जात आहे.

पंचगंगा नदीकाठी असणार्‍या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ कराव्यात ! – राजू यादव, करवीर शिवसेना

गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील सर्व गटारी प्लास्टिक आणि इतर कचरा यांनी तुडुंब भरल्या आहेत. पावसाळ्यात ही गटारे तुंबून दुकानांमध्ये पाणी जाऊन प्रचंड हानी होते.

‘ई’ पंचायत (आपले सरकार सेवा केंद्र) मध्ये सांगली जिल्हा राज्यात प्रथम, तर कोल्हापूर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर !

केंद्रशासनाच्या वतीने सर्व दाखले संगणकावर देण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच कामामध्ये पारदर्शकता यावी, गावातील सर्व गोष्टींची संगणकावर नोंद व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

कोरोनाचे वैश्‍विक संकट दूर व्हावे, याकरिता पुणे येथील दगडूशेठ गणपति मंदिरात विशेष यागांचे आयोजन

वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम चालू आहेत.

राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्‍वराने शक्ती द्यावी ! – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

परमेश्‍वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ?

राजस्थानमधील संवित् सोमगिरी महाराज यांचा देहत्याग !

बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.

केजरीवाल देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत देशाचे मत नाही ! – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सिंगापूरकडे स्पष्टीकरण

अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत हे देशाचे मत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सिंगापूरला स्पष्ट केले.

इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये २१३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलच्या अशा धडक कारवाईमुळेच शत्रूच्या हृदयात धडकी भरते ! पाकलाही हीच भाषा समजते, हे भारताने लक्षात घेतले पाहिजे !

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !