सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडून उत्तर मागितले !

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

हरियाणा सरकार राज्यामध्ये कोरोना रुग्णांना देणार पतंजलीचे ‘कोरोनिल किट’ !

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलि आस्थापनाच्या एक लाख ‘कोरोनिल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

आषाढीवारीसाठी संतांच्या पालख्या पायीच नेण्याची वारकर्‍यांची आग्रही मागणी !

श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यातील सर्व घटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. थोडक्या स्वरूपात का होईना, पायी वारी झाली पाहिजे, याविषयी आम्ही आग्रही आहोत.’’

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’, या पुस्तकावर बंदी घाला ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘ही सर्व पुस्तके शासनाने कह्यात घ्यावीत आणि या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यात विलंब !

मृत्यूनंतर देयक न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला, तर ‘देयक भरून मृतदेह कह्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे न आल्याने विलंब झाला आहे’, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी १ जूनअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

या कालावधीत शेतीविषयी सेवा आणि शेती चालू रहाण्यासाठी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे अन् त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणार्‍या सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू रहातील.

सरकारच्या नव्या नियमांचे पालन करण्यास सिद्ध; मात्र काही सूत्रांवर चर्चा आवश्यक ! – फेसबूक

भारतात व्यावसाय करतांना भारताच्या नियमावलींचे पालन न करणार्‍या आस्थापनांवर भारत सरकारने आता बंदी घातली पाहिजे !

घोटाळेबाज मेहूल चोक्सी अँटिग्वामधून क्युबामध्ये पळाला !

पंजाब नॅशनल बँकेच्या १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असणारा मुख्य सूत्रधार मेहूल चोक्सी याने दक्षिण अमेरिका खंडा जवळील अँटिग्वा बेटावरील पोलिसांना चकमा देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही ? जर सरकारने अशांच्या नातेवाइकांसाठी एखादी योजना लागू केली, तर त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल ?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.

ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे ! – आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे.