कोरोनाच्या विरोधातील युद्धाचे दायित्व नितीन गडकरी यांना द्या !  

इस्लामी आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद यांना भारत पुरून उरला. त्याप्रमारणे कोरोना महामारीलाही भारत सामोरे जाईल. आता कडक उपाययोजना न केल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल.

बेंगळुरू महापालिकेच्या कोविड वॉर रूममध्ये एकाच समुदायाचे लोक का ? – तेजस्वी सूर्या यांचा प्रश्‍न

येथील महानगरपालिकाच्या कोविड वॉररूममध्ये मुसलमान सदस्यांची नियुक्त केल्यावरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या वेळी टीका केली. या वेळी त्यांनी  ‘कोविड वॉररूम’साठी नेमणूक करण्यात आलेल्या १७ लोकांच्या सूचीतील नावे वाचून दाखवली.

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाच्या विसंगत आदेश निर्गमित

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विसंगत पत्र सिद्ध करून ते प्रसिद्ध केले आहे. सध्या ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कोरेगावातील विविध प्रसिद्धीगटांमध्ये फिरत आहेत.

पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर धर्मांधांकडून माजी हिंदु सरपंचाच्या घरात घुसून गोळीबार

धर्मांधांच्या हाती अधिकार आल्यावर काय होते, हे यातून दिसून येते. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण कायदा रहित  

महाराष्ट्र सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रहित केला. ५ मे या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला.

वरिष्ठ अधिकारी नोकराप्रमाणे वागणूक देत असल्याने पोलिसाचे त्यागपत्र !

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कनिष्ठ पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडतात.

बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे ‘आयपीएल्’ क्रिकेट स्पर्धेला स्थगिती !

या स्पर्धेला अनुमती देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे आणि या स्पर्धेसाठीचा पैसा गरीब कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वापरला पाहिजे, अशीच जनतेची मागणी आहे !

तुम्ही आंधळे असू शकता, आम्ही नाही !

न्यायालयाने ‘येथे लोकांचे प्राण पणाला लागले असून हे भावनिक सूत्रच आहे’, असे सांगितले. देहलीतील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.