‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत सातारा पोलिसांकडून ३ कोटी रुपये दंड वसुली !
मार्च ते मे या कालावधीत नियम मोडणार्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० लाख १ सहस्र ९०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
मार्च ते मे या कालावधीत नियम मोडणार्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० लाख १ सहस्र ९०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
कोरोनाकाळात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. गीता वाचन हा मन:शांतीसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे गीता ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिदत्त जाधव यांनी केले.
सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विचार करून योग्य दर निश्चित करावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.
राज्यात शासकीय कर्मचार्यांच्या सहकारी पतसंस्थांच्या राखीव निधीची रक्कम अनुमाने ५ सहस्र कोटी रुपये इतकी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
संभाजी गुरव हे मुंबई पोलीस दलात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘एव्हरेस्ट’ शिखर पार करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील गुरव हे तिसरे कर्मचारी आहेत.
दळणवळण बंदी होऊन एक मास उलटला, तरी हा निधी कामगारांच्या अधिकोषामधील खात्यात वर्ग झालेला नाही; कारण कामगार कार्यालयातून होणारी नोंदणी आणि नूतनीकरण गेल्या ६ वर्षांपासून बंद आहे.
कोविड सेंटरमध्ये बर्याच दिवसांपासून एकही रुग्ण नव्हता, तसेच या भागात मे मासात सक्रिय रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणूनच आम्ही त्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने २६ मे या दिवशी दगडूशेठ गणपति मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होण्याचे श्रेय डॉक्टरांना देण्याऐवजी येशू ख्रिस्ताला दिले होते. या ख्रिस्तीधार्जिण्या वक्तव्याविषयी आय.एम्.ए. त्यांच्यावर दावा प्रविष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ?