श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयाकडून जामीन संमत !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

डावीकडून दीपाली चव्हाण आणि श्रीनिवास रेड्डी

नागपूर – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अंतरिम जामीन दिला आहे. रेड्डी यांनी प्रथम दर्शनी कुठलाही आरोप नाही किंवा त्यांचे नाव तक्रारीत नसल्याच्या आधारावर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यात न्यायालयाने नागपूर सोडून न जाण्याच्या अटीवर हा अंतरिम जामीन संमत केला आहे.