भुयारी गटार योजनेमुळे सातारा शहरातील मंगळवार पेठेतील रस्त्यांची चाळण
सातारा नगरपालिकेच्या वतीने ऐव पावसाळ्याच्या तोंडवर भुयारी गटार योजना शहरातील मंगळवार पेठेत राबवण्यात येत आहे. यासाठी मंगळवार पेठेतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या वतीने ऐव पावसाळ्याच्या तोंडवर भुयारी गटार योजना शहरातील मंगळवार पेठेत राबवण्यात येत आहे. यासाठी मंगळवार पेठेतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत.
‘हॉटेल मिलन’च्या मालकाने हॉटेलमध्येच ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ही माहिती मिळाल्यावर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी ही कारवाई केली.
पवार यांनी पुढे म्हटले आहे की, बारामती तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लहान मुलांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवाव्यात.
सणासुदीच्या काळात व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि कर्मचारी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. दळणवळण बंदीचा व्यापार क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याने व्यापार्यांची हानी झाल्याचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी संमत केलेले ५ टी.एम्.सी. पाणी त्वरित रहित करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी २४ मे पासून पंढरपूर येथे या आंदोलनाचा प्रारंभ झाला.
शासकीय रुग्णालयासाठी प्रतिदिन अर्धा ते १ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. एकदा हा टँक पूर्ण क्षमतेने भरल्यावर हा ऑक्सिजन अंदाजे १७ ते १८ दिवस पुरेल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
२२ मे या दिवशी ‘मॉर्निंग वॉक’साठी रस्त्यांवर फिरणार्या ७० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’मुळे (काळी बुरशी) आतापर्यंत ३ जणांचे मृत्यू झाले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच; पण जिल्ह्यात कुठेही आगीची घटना घडल्यास विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागते.
काळ्या आणि पांढर्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.