ईदच्या नमाजासाठी २५ लोकांना एकत्र येण्याची अनुमती द्यावी !

मुसलमान समुदायाची सातारा जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अवाहनानुसार हिंदूंनी त्यांचे सर्व सण-उत्सव घरात राहून साजरे केले आहेत. त्यामुळे प्रशासन आता नमाजपठणासाठी अनुमती देणार कि ते घरीच करण्याचा आदेश देऊन खर्‍या अर्थाने सर्वधर्मसमभाव दाखवणार ?

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ११ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील प्रत्येक मशीद आणि मोहल्ला येथे रमझान ईदच्या निमित्ताने किमान २५ जणांना एकत्र येऊन नमाजपठण करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी मुसलमानांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी कोरोनाचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.