‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी
वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत.
वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत.
जिल्ह्यातील गावांत ४६३ ‘ग्रामबाल संरक्षण समित्या’ कार्यरत आहे. समित्यांना निराधार झालेल्या बालकांचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या गोटीवालाधडा या मंदिरामधील नाकोडा भैरव जैन मंदिरातून १६ मेच्या रात्री २ चोरांनी दानपेटीसह १ लाख ५३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) यांनी धाड घातली.
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असूनही आंदोलनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्या कार्यकर्त्यांवर प्रशासन कारवाई करणार का ?
कोरोनातून बरे झाल्यानंतर एका सप्ताहात काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होत असल्याचे समोर येत आहे.
विजय चौकात असलेल्या राजे बागसवार दर्गाह येथे नमाजपठणासाठी अधिक संख्येने आलेल्या लोकांना मनाई केल्यावरून जब्बार रहिमतुल्ला शेख आणि सुरज फकीर मुलाणी यांनी दर्गाहची देखरेख तसेच देवतांची पूजा करण्याचा परंपरागत मान असणारे सुनील लावंड यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली.
रक्तचंदनाने भरलेला ट्रक ताथवडे येथे आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ कोटी ५२ लाख ५४ सहस्र रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे.
विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकटात गरजूंना घरपोच भोजन, भाजीपाला पोच करणे यांसह अग्निहोत्र, यज्ञ या माध्यमातून स्वामीजी नागरिकांना साहाय्य करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.