रुग्णांच्या ‘काळी बुरशी’वरील उपचाराचा सर्व व्यय ‘महात्मा फुले जीवनदायी योजने’मध्ये समाविष्ट करा ! –  संभाजीनगर खंडपिठाचे राज्यशासनाला निर्देश

आदेश न्यायालयाला का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही कि प्रशासनाला जनतेची काळजी नाही, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरला !

राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरत चालला आहे. ५० ते ६० सहस्रांपर्यंत पोचलेली रुग्णसंख्या आता ३० सहस्रांपर्यंत खाली आली आहे.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका सौ. मधुरा लोकरे यांच्या सासूबाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुहास लोकरे यांच्या मातोश्री श्रीमती कांचन लक्ष्मण लोकरे (वय ७१ वर्षे) यांचे कर्करोगामुळे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले.

विनापरवाना कोरोना चाचणी करणार्‍या लॅबवर कारवाई

सासवड शहरातील साळीआळी भागात ही ‘पॅथॉलॉजी लॅब’ आहे. येथे ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी केली जात होती; मात्र त्यासाठी आवश्यक असणारी शासनाकडील आरोग्यसेवेच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची अनुमती नसल्याचे आढळले.

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निराधार लोकांना अन्नधान्य संचाचे वाटप

निराधार लोकांना येथील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अन्नधान्याच्या ५१ संचांचे वाटप करण्यात आले.

विरार येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून आधुनिक वैद्यांवर आक्रमण, गुन्हा प्रविष्ट

आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेंनी उपकारागृहातून भ्रमणभाषद्वारे अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे उघड

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील २ कोठडीत सापडलेल्या भ्रमणभाषद्वारे त्यांनी काही अधिवक्त्यांशी संपर्क केल्याचे तपासात उघड झाले आहे.

संभाजीनगर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून २६ दुकाने आणि आस्थापन यांच्यावर कारवाई !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कामगार उपायुक्त, महानगरपालिका आणि महसूल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ‘विशेष भरारी पथके’ सिद्ध करुन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.

रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन अन् काळजी घेतल्यास ‘म्युकरमायकोसिस’ला दूर ठेवता येते ! – आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने विशेष काळजी घेतल्यास या आजाराला स्वत:पासून दूर ठेवणे शक्य आहे, अशी माहिती विदर्भ ई.एन्.टी.सी. संघटनेचे आणि ‘टास्क फोर्स’चे अध्यक्ष आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे यांनी दिली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवावा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र राखीव कक्ष ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.