परिचारिकादिनाचे औचित्य साधून आंदोलन करणार्‍या नगर येथील परिचारिकांचे आंदोलन मोडीत !

‘परिचारिकादिनी’च मागण्या ऐकून न घेता आंदोलकांना ताब्यात घेणार्‍या रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा परिचारिका संघटनेसह अन्य नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी आंदोलन करणार !

प्राधिकरण वगळता जवळपास सर्वच शासनअंगीकृत अगदी आश्रमशाळासह सर्वांना ७ वा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र प्राधिकरण आजतागायत सातव्या आयोगाच्या प्रतीक्षेतच आहेत.

(म्हणे) ‘इस्रायलला धडा शिकवण्याची आवश्यकता !’ – तुर्कस्तानचे रशियाकडे मतप्रदर्शन

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षात प्रथम आक्रमण कोणी केले, हे तुर्कस्तान लपवून का ठेवतो ? इस्रायल तुर्कस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रांना पुरून उरला आहे, हा इतिहास आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

स्वतःच्या भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यामुळे मंत्र्यांना धमकी देणार्‍या सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंद

उद्या अशा स्थितीमुळे देशात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटू नये !

अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात २०० बॉम्बस्फोटांत २५५ जणांचा मृत्यू, तर ५०० घायाळ

रमझान हा मुसलमानांसाठी पवित्र मास समजला जातो; मात्र त्या वेळीही जिहादी आतंकवादी त्यांच्या धर्मियांना ठार मारून आसुरी आनंद घेतात, यातून त्यांचे धर्मप्रेम किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील एकही इस्लामी राष्ट्र तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आक्रमण थांबणार नाही ! – इस्रायल

भारत सरकारनेही भारतावर आक्रमण करणार्‍या पाकमधील जिहाद्यांना इस्रायलप्रमाणे चेतावणी देऊन त्याप्रमाणे धडक कृती करणे अपेक्षित !

सर्वांनी यज्ञ करून आहुती दिल्यास कोरोनाची तिसरी लाट देशाला स्पर्शही करू शकणार नाही ! – मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर

यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्‍वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्‍वर देशाला तारणार, हे निश्‍चित !

कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गेल्या काही दिवसांपासून सतत अशा घटना घडत असल्याचे समोर येत असतांना प्रशासन त्या रोखण्याविषयी निष्क्रीय का आहे ? कि याविषयी आता न्यायालयाने आदेश दिला पाहिजे, असे त्यांना वाटते ?

विविध उद्योगांकडे स्वतःच्या मालकीचे असलेले ऑक्सिजन सिलिंडर प्रशासन कह्यात घेणार

विविध उद्योगांकडे स्वतःच्या मालकीचे असलेले ऑक्सिजन सिलिंडर प्रशासन कह्यात घेणार

कोरोनोविषयी नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पसरवणार्‍या कोल्हापूर शहरातील तरुणाला अटक

जगात कोरोना वगैरे काही नाही, मास्क काढा, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांद्वारे पसरवणार्‍या सुहास पाटील या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.