१५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता !

चक्रीवादळ

मुंबई – दक्षिण अरबी समुद्रात १५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पश्‍चिमेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे १४ मेच्या रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा येथील किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली  आहे. या राज्यांतील सर्व मच्छिमार बोटी आणि अन्य बोटी यांना परतण्याची सूचना देण्यात आली आहे, तसेच पुढील काही दिवस त्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.