संभाजीनगर येथे पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी माजी सैनिकाला अटक !

दळणवळण बंदीच्या काळात केलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी अडवून १ सहस्र २०० रुपयांचा दंड ठोठावल्याचा राग आल्याने माजी सैनिक भगवान सानप (वय ३५ वर्षे) यांनी वाहतूक पोलिसांना शिरस्त्राणाने मारहाण केली

उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा २८ मे या दिवशी सातारा दौरा

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे २८ मे या दिवशी सातारा जिल्ह्यात येत आहेत.

अनावश्यक रस्त्यावरून फिरल्यास १४ दिवस रहावे लागणार विलगीकरणात !

शहरातील दाट वस्ती असणार्‍या भागांतील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आता अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, असा निर्णय सर्व प्रभाग अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.

टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चांदणी चौक परिसरातील गरीब कुटुंबियांना ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, गोडे तेल, साखर, चहा पावडर, मीठ इ. चे वाटप करण्यात आले.

सवा कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापदी मंगलदास बांदल यांना अटक

बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते; पण १ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना काढण्यात आलेले असून त्यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत.

रेल्वेतून परदेशी प्राण्यांची तस्करी करणार्‍या दोघांना पुणे ते लोणावळा या दरम्यान अटक

पुणे ते लोणावळा या दरम्यान मार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून कह्यात घेतले असता त्यांच्याकडून २७९ कासव, १ सहस्र २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत.

फेरीवाल्यांना पूर्वी घोषित केलेले आणि अद्याप न मिळालेले आर्थिक साहाय्य तात्काळ द्यावे !

गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधानांनी ४ वेळा भेट नाकारली; मात्र यापूर्वी ४० वेळा त्यांना भेट दिली आहे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी जो संघर्ष होईल, त्यामध्ये भाजपचा सहभाग असेल. संभाजीराजे यांनी नेतृत्व केले, तरी भाजप त्यांच्यासमवेत असेल.

चार मासांपूर्वी सलमानशी निकाह करून इस्लाम स्वीकारणारी श्रवंती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली !

लव्ह जिहादला एका मागोमाग एक हिंदु मुली बळी पडत असतांना कुठलेही सरकार याविषयी एक शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !

बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी ! – जगदीप धनखड, राज्यपाल, बंगाल

बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी आहे. मी पोलीस आणि प्रशासन यांच्यासह सर्वांना चेतावणी देऊ इच्छितो की, त्यांनी काही चुकीचे केले, तर परिणाम वाईट होतील.