बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधून किराणा साहित्याची विक्री २३ मेपासून बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली 

जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १९ ते २६ मे या कालावधीत  प्रतिबंधात्मक आदेशांची कार्यवाही करण्यात येत आहे यामुळे आता २३ मेपासून कृषी उत्पन बाजार समितीमधून किराणा साहित्याची विक्री २३ मेपासून बंद राहिल.

पैठण येथे बनावट आधुनिक वैद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाचे आक्रमण !

कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.

राजीव गांधी यांच्या हत्येतील ७ दोषींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी !

‘या दोषींनी गेली ३ दशके पुष्कळ त्रास सहन केला आहे. त्यांनी केलेल्या अपराधाची मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा माफ करण्यात यावी’, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या पत्रात म्हटले आहे.

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !

हुंडाबंदी कायद्याला ६० वर्षे पूर्ण होऊनही राज्यात प्रतिवर्षी २०० विवाहितांचे हुंड्यासाठी बळी !

हुंडाबंदी कायदा असतांना प्रतिवर्षी २०० जणांचे बळी जाणे दुर्दैवी आहे. कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचा हा परिणाम गंभीर आहे. यासाठी दोषींना त्वरित शिक्षा झाल्यास हुंडाबळीच्या घटना थांबतील !

चीनने अरुणाचल प्रदेशजवळील सीमेपर्यंत बांधला महामार्ग !

चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

कोरोना, चक्रीवादळ आणि आता हिमनग वितळून समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, ही सर्व आपत्काळाची लक्षणे आहेत ! अशा भीषण आत्पकाळाला सामोरे जाता यावे, यासाठी आता तरी साधना करा !

बेंगळुरू येथे बनावट कोरोना प्रमाणपत्र देणारे २ डॉक्टर गजाआड

लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्‍या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.