राजकीय ‘लस’ !

जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !

जिहादी फतवा !

भारताच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात काही बोलले, तर आपण नेस्तनाबूत होऊ’, एवढी दहशत भारत सरकारने जिहाद्यांच्या मनात निर्माण करणे अपेक्षित होते. परंतु भारताने ती निर्माण न केल्यामुळे झाकीर याच्यासारखा जिहादी हा हिंदूंच्या विरोधात अशी विधाने करतो.

मृत्यूदंडाच्या कार्यवाहीची आवश्यकता !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षेची कार्यवाही केल्याच्या चांगल्या परिणामांचे अन्य कोणते चांगले उदाहरण असू शकेल ? लोकशाहीवादी अमेरिकेने चांगला पायंडा पाडला आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेकडून बोध घेऊन मृत्यूदंड अथवा फाशीच्या शिक्षांची तात्काळ कार्यवाही करून जनतेचे सर्वंकष हित साध्य करावे !

आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य नव्हे !

वुहानचे वास्तव !

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अन्य देशांतील आकडे लाखांच्या घरात जात असतांना चीनमध्ये केवळ काही सहस्र नागरिकांचीच माहिती होती. याचे कारण आता लक्षात येत आहे की, ज्यांनी ही माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची चीनने मुस्कटदाबी केली, त्यांचा छळ केला.

उद्ध्वस्त मंदिराच्या निमित्ताने… !

गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ?

उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !

गोमाता आणि डुक्कर !

भारतासह जगातील काही मुसलमान संघटनांनी दावा केला आहे, ‘कोरोनाची लस बनवतांना त्यामध्ये डुकराची चरबी वापरण्यात आली आहे’, तर भारतात हिंदु महासभेने शंका व्यक्त केली आहे, ‘यामध्ये गोमांसाचा वापर करण्यात आला आहे.’ मुसलमानांनी थेट यावर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नेपाळी नाट्य !

नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.