‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्‍या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !

‘मित्रप्रेम तरुण मंडळा’तील कार्यकर्तीला ‘लव्ह जिहाद ?’, ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देतांना श्री. शिवानंद स्वामी

कोल्हापूर – कपिलतीर्थ येथील ‘मित्रप्रेम तरुण मंडळ’ यांच्या वतीने ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख श्री. शिवाजीराव जाधव, देखाव्याचे निर्माता-दिग्दर्शक श्री. स्वप्नील यादव, तसेच नाटक साकारणारे प्रमुख कलाकार यांना हिंदु जनजागृती समितीचे ‘लव्ह जिहाद ?’, ‘हलाल जिहाद ?’, तसेच (पू.) सु.ग. शेवडे लिखित ‘शंभूराजे’ हे ग्रंथ भेट देण्यात आले.

मित्रप्रेम तरुण मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, अधिवक्ता केदार मुनीश्वर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळावावा’चे श्री. योगेश केरकर, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे यांसह अन्य उपस्थित होते.