जिहादी फतवा !

इस्लामी देशात मंदिरे अथवा मूर्ती असतील, तर त्या फोडल्या पाहिजेत’, असे विखारी वक्तव्य आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर नाईक याने केले आहे. पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील तेरी गावात एका मौलवीच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर झाकीर नाईक बरळला आहे. पाकमध्ये हिंदूंची मंदिरे अथवा हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती यांची तोडफोड होणे, ही नित्याची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी ही कृती धर्ममान्य आहे. अशा कृतींमुळे जगभरातील हिंदू दुखावला आहे. या पार्श्‍वभूमीवर झाकीर याने केलेले हे वक्तव्य हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. त्याही पुढे जाऊन कळीची गोष्ट ही की, हे सूत्र पाक, बांगलादेश किंवा अन्य इस्लामी देश येथील एखाद्या मौलवीने अथवा तेथील धर्मांध नेत्याने केले असते, तर भारतातील हिंदूंनी त्याकडे एवढे लक्ष दिले नसते; मात्र हे वक्तव्य डॉ. झाकीर नाईक याने मलेशियात बसून केले आहे.

झाकीर हा मूळ भारतीय आहे. ‘नाईक’ हे हिंदूंचे आडनाव लावून तो मिरवतो आहे. श्री गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य टिपण्या केल्यावर झाकीर याच्या विरोधात भारतात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अनेक धर्माभिमानी हिंदूंनी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. अटकेच्या भीतीने तो मलेशियात पसार झाला. त्यानंतर बांगलादेशात जो बॉम्बस्फोट झाला, तो करणारे जिहादी आतंकवादी झाकीर याच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन आतंकवादी झाले होते, हे पुढे आले. यानंतर या ना त्या कारणांमुळे झाकीर याचे नाव वारंवार पुढे येत गेले. कधी आतंकवादाला प्रोत्साहन दे, कधी हिंदूंवर अत्याचारांचे समर्थन कर, असे प्रकार त्याच्याकडून वारंवार होत आहेत. आता तर पाकमधील हिंदूंवर अत्याचार होत असतांना जगभरातील हिंदू चिंतित आहेत. असे असतांना भारताच्या भूमीत निपजलेला झाकीर नाईक हिंदूंविषयी असे बोलतो, हे संतापजनक आहे. हे भारताच्या सरकारी यंत्रणांचेही अपयश आहे. हिंदूंच्या विरोधात बोलणारा, लिहिणारा आणि जिहाद्यांना चिथावणारा झाकीर नाईक हा भारताबाहेर कसा पोचला ? तो मलेशियात जाऊन लपून बसला असतांना त्याला आणण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करत आहे ? काही मासांपूर्वी झाकीर नाईक याला भारताकडे सुपुर्द करण्याविषयी मलेशिया सरकारशी चर्चा चालू होती. मलेशिया हा मुसलमानबहुल देश. तेथील सरकार विविध प्रकारे भारत सरकारची मागणी धुडकावून लावत आहे. असे असतांना मलेशियाकडे विनवण्या करत बसण्यापेक्षा भारत सरकार आक्रमक धोरण का अवलंबत नाही ? ‘वास्तविक भारताच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात काही बोलले, तर आपण नेस्तनाबूत होऊ’, एवढी दहशत भारत सरकारने जिहाद्यांच्या मनात निर्माण करणे अपेक्षित होते. भारताने ती निर्माण न केल्यामुळे झाकीर याच्यासारखा जिहादी हा हिंदूंच्या विरोधात अशी विधाने करतो. झाकीर याच्यासारख्यांना वठणीवर आणण्यासाठी भारताने शत्रूला जेरीस आणणार्‍या इस्रायलसारखी रणनीती अवलंबणे आवश्यक आहे.