पुणे – पदपथावर वेगवेगळ्या वस्तूंच्या विक्रीचे दुकान काढतांना २ विक्रेत्या महिलांनी महिला पोलिसांच्या गणवेशाच्या शर्टची २ बटणे तोडली. तिसर्या महिलेने ‘आंदेकरच्या ऑफिसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते ?’, अशी धमकी दिली. (पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ? – संपादक) या प्रकरणी उमा रणदिवे आणि रोशनी रणदिवे या मायलेकींसह ३ महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार बेलबाग चौकामध्ये १६ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता घडला आहे.