नवी देहली – मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देणारे अरविंद केजरीवाल हे आठवडाभरात त्यांचे सरकारी निवासस्थान सोडणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, केजरीवाल त्यांच्या सर्व सरकारी सुविधाही सोडणार आहेत. ते कुठे रहाणार आहेत ?, हे अद्याप ठरलेले नाही.
Arvind Kejriwal to Vacate CM Residence Within a Week!
AAP’s Sanjay Singh confirms update
Key Highlights:
– Arvind Kejriwal tenders resignation as Delhi CM– Visits L-G Secretariat with AAP MLA delegation
pic.twitter.com/wHBmvNruLg— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 18, 2024
आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांची आप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर केजरीवाल यांनी उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे त्यागपत्र सुपुर्द केले. देहलीतील मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी जामिनावर सुटल्याच्या दुसर्याच दिवशी केजरीवाल यांनी त्यागपत्र दिले होते.