अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवणारा कह्यात !

गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या व्यक्तीस आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.

द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना व्यवहार्य नसल्याचे कारण देत गुंडाळली !

सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना अव्यवहार्य असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही योजना गुंडाळण्यात आली आहे. याविषयी महामंडळाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता आ.पं. नागरगोजे यांनी सांगितले.

सातारा येथे भुयारी रस्त्यावरील नामफलक फाडल्याने तणाव

८ जानेवारी या दिवशी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भुयारी रस्ता (ग्रेड सेपरेटर) खुला करत असल्याचे जाहीर केले. मात्र ९ जानेवारीच्या पहाटे नामफलक फाडल्याचे समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे.

कर्नाटकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या स्वजातीतील पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला मिळणार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून हिंदूंचे नकारात्मक चित्रण

हिंदूंना भ्रष्ट आणि गुंड, तर मुसलमानाला दाखवले चांगले ! ‘अ‍ॅमेझॉन’कडून सातत्याने होणारा हिंदुद्वेष रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतातरी त्याच्यावर बंदी घालावी आणि हिंदुद्वेष कायमचा थांबवावा !

(म्हणे) ‘महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्कार टळला असता !’

कुठे रामराज्यात अंगावर सोन्याचे दागिने घालून मध्यरात्रीही घराबाहेर पडू शकणार्‍या महिला, तर कुठे महिलांना ‘सायंकाळीही घराबाहेर पडू नका’, असा फुकाचा सल्ला देणार्‍या कलियुगातील महिला आयोगाच्या महिला सदस्या !

वर्ष १९७१ च्या बांगलादेशातील नरसंहारासाठी पाकने अधिकृतरित्या क्षमा मागावी ! – बांगलादेशाची मागणी

पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या वडिलांकडून हत्या !

या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट कायदा हातात घेऊन खरा प्रेमी असणार्‍या हिंदु तरुणाची हत्या करतात !

शिर्डीतील साई संस्थानच्या वस्त्र संहितेविषयीच्या फलकाला काळे फासले !

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणता पोशाख परिधान करावा, याविषयी धर्मशास्त्रात नियम आहेत. त्याचे हिंदू पालन करू इच्छितात; मात्र त्याला विरोध करून भूमाता ब्रिगेड स्वतःचे घोडे पुढे दामटू पहात आहे. यातून त्यांची उद्दाम वृत्ती दिसून येते !

बैठकीमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप

कृषी कायदे रहित करण्यासाठी गेले दीड मास आंदोलन करत असलेले शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यावर आता १५ जानेवारीला चर्चा होणार आहे.