गोवा हिंदु युवा शक्तीने झेंडूची फुले विकणार्‍या परराज्यांतील धर्मांधांचा १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा व्यवहार रोखला

प्रतिकात्मक छायाचित्र

म्हापसा – गोवा हिंदु युवा शक्तीने प्रसारित केलेल्या एका माहितीनुसार गोवा युवा शक्ती या संघटनेने म्हापसा, शिवोली, पर्वरी, कळंगुट, पणजी आणि परिसरातील हिंदूंनी विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले परराज्यांतील धर्मांधांकडून न घेण्याविषयी प्रबोधन करून त्यांचा अंदाजे १ कोटी १२ लाख ५० सहस्र रुपयांचा व्यवहार रोखला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथे १५ चारचाकी मालवाहू वाहनांतून आणलेल्या झेंडूच्या फुलांची विक्री हिंदूंचे प्रबोधन करून रोखल्याने अंदाजे ६७ लाख ५० सहस्र रुपये धर्मांधांकडे जाण्यापासून रोखण्यात आले. त्याचप्रमाणे शिवोली, पर्वरी, कळंगुट, पणजी आणि परिसर येथील १० मालवाहू वाहनांतून आणलेल्या ४५ लाख रुपयांच्या झेंडूच्या फुलांची विक्री रोखली. या लाखो रुपयांच्या विक्रीतून शासनाला कोणताही कर मिळत नाही. हा हिंदु समाजासाठी मोठे यश आहे, असे हिंदु युवा शक्तीने म्हटले आहे.