|
ठाणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली येथे नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन उत्साहात पार पडले. ठाकुर्ली भागातील चोळेगाव येथील तलावाच्या विसर्जन घाटावर नागरिकांनी आणलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरा वाहून नेणार्या वाहनाचा वापर केला होता. त्यामुळे ९ दिवस देवीसाठी श्रद्धेने वाहिलेले निर्माल्य १० व्या दिवशी कचरा वाहून नेणार्या वाहनात टाकावे लागत होते. यामुळे हिंदूंनी महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. (केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा हिंदूंनी कचर्याच्या गाडीत निर्माल्य टाकणार नाही, असा आक्रमक पवित्रा का घेतला नाही ? – संपादक)
हे निर्माल्य महानगरपालिकेच्या उंबर्डी येथील क्षेपणभूमी येथे पुढील प्रक्रियेसाठी नेल्याचे समजते. ‘पालिका प्रशासनाने लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी’, अशी मागणी विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी केली.