वर्ष १९७१ च्या बांगलादेशातील नरसंहारासाठी पाकने अधिकृतरित्या क्षमा मागावी ! – बांगलादेशाची मागणी

पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !

डावीकडून विदेश राज्य मंत्री शहरियार आलम आणि पाकिस्तानी राजदूत इमरान अहमद सिद्दीकी

ढाका (बांगलादेश) – पाकने वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात केलेल्या नरसंहारासाठी अधिकृरित्या क्षमा मागावी, अशी मागणी बांगलादेशने केली आहे. बांगलादेशचे विदेश राज्य मंत्री शहरियार आलम यांनी बांगलादेशातील पाकने नवनियुक्त पाकिस्तानी राजदूत इमरान अहमद सिद्दीकी यांची भेट घेतल्यानंतर ही मागणी केली.

वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० लाख बांगलादेशी नागरिकांना ठार केले होते, तर २० सहस्र महिलांवर बलात्कार केला होता.