राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला सदस्याचे दायित्वशून्य वक्तव्य !
|
बदायू (उत्तरप्रदेश) – येथे एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात मंदिराच्या एका पुजार्याचाही समावेश आहे. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर नोंद घेत आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पाठवले होते.
NCW member Chandramukhi was sent by the commission to visit the kin of the Badaun gangrape victim.
(@PoulomiMSaha)https://t.co/5Ws8HnC2uz— IndiaToday (@IndiaToday) January 8, 2021
या वेळी चंद्रमुख देवी यांनी, ‘‘पीडित महिला कुणाच्या दबावाखाली असेल, तर तिने वेळ लक्षात घ्यायला हवी होती. उशिरा घराबाहेर जाणे टाळले पाहिजे होते. पीडित महिला संध्याकाळी एकटी घराबाहेर पडली नसती किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यासमवेत गेली असती, तर आज तिचे प्राण वाचले असते’’, असे संतापजनक विधान केले.
(सौजन्य : India Today)
चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, ‘‘महिला त्यांच्या इच्छेने त्यांना वाटेल तेव्हा कधीही आणि कुठेही बाहेर फिरू शकतात.’’