ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
पुणे – गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या व्यक्तीस आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. पंकज छल्लाणी असे फसवणूक करणार्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मान्य केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या प्रकरणाचा तपास करत आहेत.