नंदुरबार – विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्ववादी यांच्या वतीने येथे सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभ मोठा मारुति मंदिराचे पुजारी श्री. विलास जोशी यांनी मंत्रपठण करून केले. मंदिराचे अध्यक्ष अशोक अण्णा चौधरी, सचिव कल्याण पाटील, सैन्य दलातील मेजर अरविंद निकम, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश गिरनार यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी हिंदु सेवा साहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे नरेंद्र तांबोळी, देवाभाऊ कासार, दिग्विजय ठाकरे आणि मनसेचे युवा अध्यक्ष कुमारी आश्लेषा पवार अन् विविध संघटनांचे मान्यवर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी दुर्गादेवीचा नामजप आणि आरती करून रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र मराठे यांनी केले. सर्वश्री आकाश गावित, योगेश चौधरी, हर्षल देसाई, राहुल मराठे आणि सुमित परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.