सोलापूर – दत्तनगर येथील श्री मार्कंडेय रुग्णालयाच्या परिसरात एका भिंतीवर देवतांची चित्रे असलेले फ्लेक्स फलक लावून ‘येथे कचरा टाकू नये’, असे आवाहन करण्यात आले होते. अशा प्रकारे देवतांचे विडंबन होत आहे, हे लक्षात आल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींनी संबंधित व्यक्तीला संपर्क करून आणि त्याचे प्रबोधन करून फलक काढायला लावले. (देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करणार्या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)
सर्वश्री रोहित बिराजदार, रेवण बिराजदार, लक्ष्मण कोळी, तेजस पिसाळ, आकाश बिराजदार, विपीन गणपा, पुष्कर कोळी हे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गात नियमित येतात. धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे नियमित धर्माचरणसुद्धा करतात. धर्मशिक्षणवर्गात विविध प्रकारे देवतांचे होणारे विडंबन आणि ते रोखण्याची आवश्यकता लक्षात आल्यावर सर्वांनी मिळून वरील प्रकारे प्रयत्न करून देवतांचे विडंबन रोखले.