छत्रपती शिवाजी महाराज यांनी लागू केलेले कायदे पुन्हा लागू करण्याची आवश्यकता आहे ! – शरद पोंक्षे, अभिनेते

महिलांवरील अत्याचार हे सर्व आता बोलण्याच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे मनस्ताप होतो. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते. त्यांनी जे कायदे लागू केले होते, ते आता पुन्हा लागू करण्याची आवश्यकता आहे

 यवतमाळ येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अनुष्का करोडदेव हिचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक

सनातनची साधिका कु. अनुष्का करोडदेव हिची ‘विज्ञान अमर रहे’ या नाटिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याविषयी मुलींमधून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक श्री. पळसकर यांनी तिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

महिलांचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी चोप देऊन सामाजिक प्रसारमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केला

माटुंगा रेल्वेस्थानकावर येणार्‍या जाणार्‍या महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग करणार्‍या रजिऊर खान या धर्मांधाला शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी चोप दिला.

उत्तरप्रदेश शासनाच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ६००, तर काशीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद

देशातील सर्वच तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्येक राज्यांनी अशी तरतूद केली पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

परभणी येथे उरूस यात्रेत धारदार शस्त्रसाठा जप्त

येथील उरूस यात्रेमध्ये चोरट्या आणि अवैधरित्या धारदार शस्त्रांची विक्री करणार्‍या संभाजीनगर येथील ४ धर्मांधांना अतिरिक्त पोलीस निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून अटक केली. आरोपींकडून शस्त्रे, भ्रमणभाष आणि रोख रक्कम ३६ सहस्र ३३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

(म्हणे) ‘एल्गार परिषदेचे अन्वेषण म्हणजे विचारवंतांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न !’ – बाळासाहेब थोरात, काँग्रेस

‘एल्गार’ हे पुरोगामी व्यासपीठ होते. या व्यासपिठावर असलेले सगळे कवी आणि विचारवंत होते. त्यांच्या विरोधात काही पुरावा असेल, तर आम्ही बाजू घेणार नाही; मात्र त्यांचे अशा प्रकारे अन्वेषण करणे म्हणजे विचारवंतांचा विचार दाबण्याचा प्रयत्न आहे का ?, असा प्रश्‍न पडतो आहे.

(म्हणे) ‘आवश्यकता किंवा मागणी नसतांना दुसर्‍या देशातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व !’ – योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते

सरकारने देशाची धर्मशाळा केली असून आवश्यकता किंवा मागणी नसतांना दुसर्‍या देशातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये ध्रुवीकरण करत आहे.

राष्ट्रव्यापी ७ व्या आर्थिक गणनेस नागरिकांनी सहकार्य करावे ! – जिल्हाधिकारी

गणनेचा नागरिकत्व कायदा आणि नियम यांच्याशी संबंध नसल्याचे प्रतिपादन

तुर्भे (नवी मुंबई) येथील भाजपच्या चार नगरसेवकांचा राजीनामा

तुर्भे येथील भाजपचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी राजीनामे देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घोषित केला आहे.