सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याला हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर हे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही !

 आंध्रप्रदेशमध्ये आणखी एका मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

केरळमधील हिंदु ऐक्य वेदीच्या ४ कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका !

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक ! केरळमध्ये हिंदुद्वेषी, मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंवर विनाकारण कारवाई होते !

सर्वांना नाही, तर केवळ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस विनामूल्य मिळणार !

देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.

२६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – संदीप देशपांडे, मनसे

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही विरोध

काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास ठाम विरोध केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असणे, हा शिवरायांचा अपमान ! – शिवसेना

जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे.

‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या कुलुमनाली दौर्‍यातील २ लाख ४६ सहस्र रुपयांच्या प्रवास व्ययाच्या चौकशीचे आदेश

‘कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँके’च्या ६ संचालक प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौर्‍यावर गेले असता २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय आला आहे. याविषयी चौकशी करून १५ दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.

देशभरातील पुरोगामी संघटनांची संयुक्त शिखर समिती स्थापन

पुरोगामी चळवळीत काम करणार्‍या विविध संघटनांची ‘जिल्हा सेवा समिती’ नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय झाला.

मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याचे कठोर पालन करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली.