नवी देहली – भारतातून युक्रेनला तोफगोळे पाठवण्यात आल्याच्या ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही रॉयटर्सचा अहवाल पाहिला आहे. हे काल्पनिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे, तर तसे काहीही नाही. भारत सैनिकी वस्तूंच्या निर्यातीविषयी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करतो आणि या संदर्भात भारताचा इतिहास निर्दोष आहे.
Our response to media queries on Reuters report on diversion of Indian Defence Exports to Ukraine:https://t.co/uvfgB8gF3f pic.twitter.com/3qIVU0W9YW
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 19, 2024
रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले होते की, युक्रेन रशियाविरुद्धच्या युद्धात भारतीय तोफगोळे वापरत आहे. भारताने ही शस्त्रे युरोपीय देशांना विकली होती; पण आता युक्रेन त्यांचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले. रशियाचा विरोध असूनही भारताने ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असा दावाही वृत्तात करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशी वृत्ते पेरून ‘रॉयटर्स’सारख्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून युरोपीय देश भारत आणि रशिया यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का, याचाही शोध घेणे आवश्यक ! |