रुळावर ६ मीटर लांबीचा लोखंडी खांब ठेवणार्या तिघांना अटक !
देहराडून – चालकाच्या (‘लोको पायलट’च्या) सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला. उत्तराखंडमधील बिलासपूर रोड आणि रुद्रपूर शहर या दरम्यान ही घटना घडली. १८ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता १२०९१ या क्रमांकाची रेल्वे बिलासपूरहून रुद्रपूरच्या दिशेने जात होती. या वेळी चालकाला रेल्वे रुळावर काहीतरी ठेवलेले दृष्टीस पडले. चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. त्यानंतर चालकाने रुद्रपूर शहर रेल्वे स्थानकाच्या प्रमुखाला घटनेची माहिती माहिती दिली. रेल्वेच्या अधिकार्यांना रुळावर ६ मीटर लांबीचा लोखंडी खांब सापडला. त्यांनी तो बाजूला काढून रेल्वे मार्गस्थ केली.
उत्तर रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी ३ संशयितांना अटक केली आहे. त्यांनी रेल्वेला अपघात घडवून आणण्याचा काही कट रचला होता का ?, याचे अन्वेषण रेल्वे पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकासातत्याने घडणार्या अशा घटनांची पाळेमुळे खणून काढून सरकारने दोषींना फासावर लटकवले पाहिजे ! |