Wafq Board : काँग्रेसने वक्फ बोर्डाला लुटण्याचे स्वातंत्र्य दिले ! – मुफ्ती शामून कासली, अध्यक्ष, उत्तराखंड मदरसा बोर्ड

मुफ्ती शामून कासली

नवी देहली – देशात वक्फ मालमत्ता विधेयकावर वाद चालू असतांना, उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शामून कासली यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड आणि काँग्रेस यांनी वक्फ मालमत्तेची लूट आणि नासधूस केली. ‘मुसलमान समाजातील अनेक लोकांचे असे मत आहे की, वक्फ मालमत्ता विधेयक हे वक्फ मालमत्तेच्या योग्य देखभालीसाठी आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शामून कासली म्हणाले की, काँग्रेसने तिच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात वक्फ संपत्तीची नासधूस केली आणि वक्फ बोर्डाला लुटण्याचे स्वातंत्र्य दिले. काँग्रेसने स्थापन केलेली मंडळे आणि त्यांचे अध्यक्ष यांची चौकशी झाली, तर ते कारागृहात जातील.

केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्यावर मुफ्ती कासली यांच्या मताचे समर्थन केले आहे.