|
नंदुरबार, २० सप्टेंबर (वार्ता.) – ईद-ए-मिलादनिमित्त १९ सप्टेंबर या दिवशी नंदुरबार, दोंडाईचा (जिल्हा धुळे) आणि जालना येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत (जुलूसात) धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. तसेच हिंदूंच्या घरांवर तुफान दगडफेक करत हिंदूंच्या वाहनांचीही प्रचंड नासधूस केली.
🚨Maharashtra : Bigots create havoc in Nandurbar, Dondaicha (Dhule), and Jalna
– Stones pelted on Hindu homes and vehicles!
– Desecration of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue
– Police resort to tear gas!
Strict action will be taken against the rioters! – Superintendent of… pic.twitter.com/w5dlIMsleS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2024
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या १५ नळकांड्या फोडल्या. या वेळी धर्मांधांनी हातात औरंगजेबाच्या समर्थनाचे फलक झळकवले. नंदुरबार येथे ४ पोलिसांसह १० नागरिक घायाळ झाले. तिन्ही शहरांतील दंगलीची परिस्थिती पहाता धर्मांधांनी पूर्वनियोजित कट करूनच हैदोस घातल्याचे स्पष्ट होते.
१. नंदुरबार
१. दुपारी २ वाजता ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या (जुलूसाच्या) वेळी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इलाही चौक परिसरातून मिरवणूक माळीवाडा परिसरात आल्यानंतर दगडफेकीची अफवा पसरली. त्यामुळे पोलिसांनी मिरवणूक थांबवली. त्यानंतर धर्माधांनी अचानक जोरदार दगडफेक चालू केली. शांततेचे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात काही पोलीस गंभीर घायाळ झाले.
२. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी ज्या वस्तीतून हिंदूंना जाऊ दिले नाही, त्याच माळीवाडा वस्तीत धर्मांध मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी हिंदूंची घरे आणि वाहने यांना लक्ष्य केले.
३. धर्मांधांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह खासगी वाहनांची तोडफोड केली, तसेच ३ घरे आणि ३ दुचाकींना आग लावण्याचा प्रयत्न केला. नवनाथनगर परिसरातील २ घरांच्या जाळपोळीसह २ सिलेंडरलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला.
४. सायंकाळनंतर परिस्थिती आटोक्यात आली. घटनास्थळी दगड-विटांचा खच पडला होता. शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
५. या घटनेचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने शहरातील इतर भागांत तणाव निर्माण झाला. परिणामी तेथील व्यापार्यांनी दुकाने बंद केली. शालेय विद्यार्थ्यांनाही लवकर घरी सोडण्यात आले.
दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाई करणार ! – पोलीस अधीक्षक, नंदुरबार
या घटनेविषयी बोलतांना नंदुरबारचे पोलीस अधीक्षक एस्. श्रवण दत्त म्हणाले की, आरोपींना सोडणार नाही. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्वांनी शांतता राखावी. सामाजिक माध्यमांत कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह अथवा नागरिकांची माथी भडकावणारे व्हिडिओ प्रसारित केल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई केली जाईल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांसमोरच फडकावले गेले पॅलेस्टाईनचे झेंडे !नंदुरबार येथे ‘डीजे’ला अनुमती नसतांना डॉल्बी (मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) लावून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. त्यावर आक्षेपार्ह गाणी लावली. पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावण्यात आले; पण पोलिसांनी याविरोधात काहीच केले नाही. (निष्क्रीय पोलीस ! – संपादक) |
२. दोंडाईचा (जिल्हा धुळे)
मिरवणुकीच्या (जुलुसाच्या) वेळी धर्मांधांनी आक्षेपार्ह घोषणा देऊन गाणी लावत तेढ निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करून तेथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावत देशद्रोही फुत्कार सोडले. (एरव्ही भगवे झेंडे लावणार्या हिंदूंवर कारवाई करून त्यांना अटक करणारे पोलीस अशा धर्मांधांवर कारवाई करण्याचे धाडस कधी दाखवणार ? – संपादक) या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत २२ जण घायाळ झाले, तर अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर शहरात अफवा पसरल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक झाली. भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या घरावरही धर्मांधांनी तुफान दगडफेक केली.
हिंदूंचा जोरदार प्रतिकार पहाताच धर्मांधांनी धूम ठोकली !दोंडाईचा येथे धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीनंतर हिंदूंनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून धर्मांधांना ‘जशास तसे’ उत्तर दिले. हिंदूंचा जोरदार प्रतिकार पहाताच धर्मांधांनी धूम ठोकली. (असे संघटन प्रत्येक वेळी दाखवल्यास धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडसच होणार नाही ! – संपादक) |
३. जालना
जालना येथील मिरवणुकीच्या (जुलुसाच्या) वेळी एम्.आय.एम्.चे अकबरुद्दीन ओवैसी यांचे ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवल्यास आम्ही १०० कोटी हिंदूंना संपवू’, हे वादग्रस्त विधान असलेल्या आशयाचे गाणे ‘डीजे’वर लावण्यात आले होते. त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करून लूट केली. या वेळी पोलीस प्रशासन हतबल दिसत होते. (कायदा-सुव्यवस्था अबाधित राखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|