केरळमधील हिंदु ऐक्य वेदीच्या ४ कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका !

बेकरीवरील ‘हलाल’ नावाचे स्टिकर कथितरित्या काढण्यास भाग पाडल्याचे प्रकरण

  • वास्तविक भारतात ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक !
  • केरळमध्ये हिंदुद्वेषी आणि मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी काहीही केले नाही, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रकार होतात, हेही विसरून चालणार नाही !

एर्नाकुलम् (केरळ) – येथे एका बेकरीच्या मालकाकडून त्याच्या बेकरीवर लावण्यात आलेले ‘हलाल’ शब्द लिहिलेले स्टिकर बलपूर्वक काढण्यास लावल्याच्या प्रकरणी हिंदु ऐक्य वेदी संघटनेच्या ४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

१. या संघटनेच्या परक्कदावू शाखेचे अध्यक्ष अरुण अरविंद आणि सचिव धनेश प्रभाकरन् यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र २८ डिसेंबर २०२० या दिवशी ‘को’ बेकरीच्या मालकाला देण्यात आले होते. यामध्ये ‘हलाल मांस निसर्गाच्या विरोधात आणि धर्माच्या आधारे भेदभाव करणारे असून ते कायद्याच्या विरोधात आहे’, असे म्हटले होते. या पत्रावरून आणि कार्यकर्त्यांनी तो स्टिकर बलपूर्वक काढल्याचे सांगत पोलिसांनी अरविंद यांच्या समवेत ४ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

 (सौजन्य : TIMES NOW)

२. विशेष म्हणजे ‘नाताळच्या काळात हलाल मांस खाऊ नये’, असे आवाहन केरळमधील ख्रिस्ती संघटनेकडून ख्रिस्त्यांना करण्यात आले होते. दुसरीकडे दक्षिण देहली महानगरपालिकेने रेस्टॉरंट आणि मांस विक्रीची दुकाने यांना ते कोणते मांस विकत आहेत किंवा शिजवत आहेत, याची माहिती देण्याचा नियम लागू केला आहे.