Karnataka Minister On Palestinian Flag: (म्हणे) ‘केंद्र सरकार पॅलेस्टाईनला पाठिंबा देत असल्याने पॅलेस्टाईनचा ध्वज धरला तर चूक काय ?’ – कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री जमीर अहमद

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री जमीर अहमद यांचा प्रश्‍न !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री जमीर अहमद

कलबुर्गी (कर्नाटक) – पॅलेस्टाईनला केंद्र सरकारनेच पाठिंबा दिला आहे. असे असतांना पॅलेस्टाईनचे ध्वज घेतल्यास काय चूक आहे ? सरकारने पाठिंबा दिल्याने आम्ही त्या देशाचा ध्वज हाती घेतला, अन्यथा घेतला नसता. इतर देशांच्या संदर्भात घोषणा देणे चूक आहे. तसे करणारे देशद्रोही आहेत. अशा लोकांना फाशी देण्यात यावी; पण पॅलेस्टाईनचा ध्वज घेतल्यास काही चूक नाही, अशा शब्दांत राज्याचे मंत्री जमीर अहमद खान यांनी मुसलमानांकडून पॅलेस्टाईनचे ध्वज फडकावण्यात आल्याच्या घटनेचे समर्थन केले.

मंड्या येथील नागमंगल भागात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत झालेल्या दंगलीच्या संदर्भात भाजप वातावरण तापवण्याचे काम करत असल्याचा आरोपही मंत्री जमीर अहमद खान यांनी केला. ‘कुणीही दंगल भडकवण्याचे काम केले, तरी कारवाई करावी. राजकारण्यांनी अशा प्रकारचे काम करू नये. जात-धर्म सोडून सर्वांना समान दृष्टीने पहावे’, असे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने पाठिंबा देणे आणि मुसलमानांनी त्या देशाचा ध्वज हातात घेणे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. केवळ धर्माच्या आधारे जर कुणी अन्य देशांचा ध्वज फडकावण्याची कृती करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे !