US Court Summons India : अमेरिकेच्‍या न्‍यायालयाने भारत सरकारला बजावले समन्‍स

(समन्‍स म्‍हणजे एखाद्या व्‍यक्‍तीला विशिष्‍ट प्रकरणात चौकशीला उपस्‍थित रहाण्‍यासाठी देण्‍यात आलेली सूचना)

खलिस्‍तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्‍नू व भारताचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेच्‍या न्‍यायालयाने खलिस्‍तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्‍नू याच्‍या हत्‍येचा कट रचल्‍याच्‍या प्रकरणी भारताचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल आणि रॉचे हस्‍तक विक्रम यादव यांना समन्‍स बजावले आहेत. या समन्‍सला २१ दिवसांत उत्तर देण्‍यास सांगितले आहे. न्‍यूयॉर्कमध्‍ये पन्‍नू याची हत्‍या करण्‍याचा कट रचल्‍याचा आरोप अमेरिकेने गेल्‍या वर्षी भारतावर केला होता. अमेरिकेने हा कट उधळून लावल्‍याचा दावा केला आहे.

समन्‍स पूर्णपणे चुकीचे ! – भारत

भारताचे परराष्‍ट्र सचिव विक्रम मिस्‍त्री

परराष्‍ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत या समन्‍सवर बोलतांना परराष्‍ट्र सचिव विक्रम मिस्‍त्री यांनी सांगितले की, हे समन्‍स पूर्णपणे चुकीचे आहे. कटाची गोष्‍ट आमच्‍या निदर्शनास आल्‍यावर आम्‍ही कारवाई केली. याप्रकरणी उच्‍चस्‍तरीय समितीही स्‍थापन करण्‍यात आली आहे.

भारतीय नागरिक निखिल गुप्‍ता यांना युरोपमधील चेक रिपब्‍लिक देशातील पोलिसांनी पन्‍नूच्‍या हत्‍येचा कट रचल्‍याप्रकरणी ३० जून २०२३ या दिवशी अटक केली होती. निखिलचे १४ जून २०२४ या दिवशी अमेरिकेला प्रत्‍यार्पण करण्‍यात आले.

संपादकीय भूमिका

आता खलिस्‍तानी आतंकवाद्याला आश्रय दिल्‍याच्‍या प्रकरणी भारतानेही अमेरिेकेला समन्‍स बजावून तिला जशास तसे उत्तर देणे अपेक्षित !