वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ मंदिरात पहाटे साडेचार वाजता मंगला आरतीच्या वेळी ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. मंदिर परिसरात तैनात असलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.
Fire In Kashi Vishwanath Temple:
A fire broke out in the Kashi Vishwanath temple during the morning aarti due to a ‘short circuit’.#Temple #Kashi pic.twitter.com/7dBj5j5Jaa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2024
आगीमुळे भाविकांचे दर्शन थांबले. जवळपास १ घंटा भक्तांना दर्शन करता आले नाही. आता मंदिर परिसरात दुरुस्तीचे काम चालू आहे. ‘शॉर्ट सर्किट’ झालेली वायर पूर्णपणे पालटण्यात आली.